सोनाक्षी सिन्हाच्या व्हिडीओवर अश्लील कमेंट्स

On: August 22, 2020 7:51 PM

औरंगाबाद : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने महिलांच्या सुरक्षे संबंधी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओवर एका तरुणाने अश्लील कमेंट्स केली होती. अश्लील कमेंट करणाऱ्या संबंधीत तरुुणास मुंबई पोलिसांनीऔरंगाबाद शहरातुन शुक्रवारी अटक केली.

अटकेतील तरुणाचे नाव शशिकांत जाधव असे आहे.सोनाक्षी सिन्हाने केलेल्या तक्रारीनुसार तिने ७ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर महिला सुरक्षेसंबंधित जनजागृतीपर एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्या व्हिडीओ बाबत जाधव याने अश्लील टिपणी केली होती.

हा प्रकार सोनाक्षीच्या लक्षात आल्यानंतर तिने मुंबईच्या सायबर पोलिसांकड़े लेखी तक्रार सादर केली. त्या तक्रारीनुसार सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रमोद खोपीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल गायकवाड यांनी तपास केला.

तांत्रिक पुरावे जमा झाल्यानंतर कमेंट करणारा तो तरुण औरंगाबाद शहरातील रहिवासी असल्याचे उघड झाले. मुंबई पोलिसांच्या पथकाने औरंगाबाद शहरात दाखल होत तुळजाईनगर येथून शशिकांत जाधव यास ताब्यात घेतले. आपण मोठी चुक केल्याचे पोलिसांच्या ताब्यातील जाधव याने कबुल केले तर सोनाक्षीने पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment