अघोरी पुजेसह गुप्तधनाचा शोध घेणा-या टोळीस पोलिस कोठडी

जळगाव – अघोरी पुजेसह गुप्तधनाचा शोध घेणा-या अटकेतील टोळीस चाळीसगाव शहर पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या टोळीला पाच दिवसांची 21 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आठ लाख रुपयांच्या मुद्देमालासह या टोळीतील सदस्यांना अटक करण्यात आली. चाळीसगाव शहर पोलिसांनी शनिवारी रात्री ही कारवाई केली आहे. एकुण नऊ जण या कारवाईत अटक करण्यात आले आहेत. चाळीसगाव  शहरातील नागद रस्त्यावरील या कारवाईने खळबळ माजली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नागद रस्त्यावरील पेट्रोल पंप परिसरात असलेल्या एका शेतातील पडीक घरात हा प्रकार सुरु होता. गुप्तधनासाठी काही जण शनिवारी रात्री अघोरी पुजा व जादूटोणा करत असल्याचे छाप्यादरम्यान आढळून आले. अटकेतील सर्वांकडून अघोरी पुजेचे साहित्य, मोबाईल व चारचाकी वाहनांसह आठ लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.  

लक्ष्मण शामराव जाधव (रा. चाळीसगाव), शेख सलीम कुतुबुद्दीन शेख (चाळीसगाव), अरुण कृष्णा जाधव (रा. आसरबारी ता. पेठ), विजय चिंतामण बागूल (रा. नाशिक), राहुल गोपाल याज्ञिक (रा. ननाशी, ता. दिंडोरी), अंकुश तुळशीदास गवळी (रा. जोरपाडा, ता. दिंडोरी), संतोष नामदेव वाघचौरे (रा. नाशिक), कमलाकर नामदेव उशिरे (रा. गणेशपूर, ता. चाळीसगाव) आणि संतोष अर्जुन बाविस्कर (रा. अंतुर्ली, ता.एरंडोल) अशी अटकेतील टोळी सदस्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून अघोरी पूजेचे साहित्य, मोबाइल व चारचाकी वाहनासह एकुण आठ लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here