भारतीयांना लवकरच मिळणार मोफत कोरोना लस

नवी दिल्ली : भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ साधारण तिन महिन्यात बाजारात उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटतर्फे कोविशिल्ड ही लस विकसीत करण्यात आली आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत देशवासीयांना भारत सरकारकडून मोफत कोरोना लसीकरण केले जाणार आहे.
पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी एका बड्या वृत्तसमुहाला मुलाखत देतांना म्हटले आहे की भारत सरकारकडून आम्हाला विशेष संशोधन प्राधान्य परवाना देण्यात आला आहे. त्यादृष्टीने आम्ही चाचणी प्रोटोकॉलची प्रक्रिया वेगात सुरु करण्यात आली आहे. चाचणी ५८ दिवसात पूर्ण केली जाणर आहे.

तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचा पहिला डोस शनिवारी देण्यात आला असून दुसरा डोस २९ दिवसांनी देण्यात येईल.चाचणीचा अंतिम डेटा दुसरा डोस दिल्यानंतर पंधरा दिवसांनी येणार आहे. त्यानंतर कोविशिल्ड व्यावसायिक वापरासाठी बाजारात आणला जाईल, तसा विचार सुरु आहे. चाचणी प्रक्रियेचे काम वेगाने सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. कोविशिल्ड लसीची चाचणी १७ केंद्रांतील १६०० लोकांमध्ये २२ ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेच्या अंतर्गत प्रत्येक केंद्रातील जवळपास १०० लोकांवर चाचणी घेतली जात आहे.

सीरम इंस्टिट्यूटने अ‍ॅस्ट्रा झेनेका नावाच्या कंपनीकडून या लसीच्या उत्पादनाचे अधिकार विकत घेतले आहेत. त्या मोबदल्यात सीरम इंस्टीट्यूटकडून अ‍ॅस्ट्रा झेनेकाला रॉयल्टी देण्यात येणार आहे. सीरम इंस्टीट्यूट ही लस भारतासह जगातील इतर ९२ देशात विक्री करणार आहे.
केंद्र सरकार ही लस थेट सीरम इंस्टीट्यूटकडून खरेदी केल्यानंतर भारतीयांना मोफत देणार आहे. केंद्र सरकार जून २०२२ पर्यंत सीरम इन्स्टिट्यूटकडून ६८ कोटी लस विकत घेईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here