जळगाव : फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत भुसावळ ते पिळोदा बुद्रुक गावा दरम्यान मानवी कवटी व हाडे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
परिसरातील लोकांमधे होत असलेल्या चर्चेतून व प्रत्यक्ष भेटीअंती पोलिसांनी घटनास्थळा भेट दिली असता त्याठिकाणी 25 जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मानवी कवटी व हाडे मिळून आली. भुसावळ ते पिळोदा गावादरम्यान रस्त्यावरील पुलाच्या पलीकडे नाल्यातील काटेरी झुडूपांमधे मानवी कवटी व हाडे मिळून आली. हा खूनाचा प्रकार आहे की गुप्तधनाच्या लालसेपोटी करण्यात आलेला अघोरी प्रकार याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे. स.पो.नि. निलेश वाघ पुढील तपास करत आहेत.