नवी दिल्ली : दररोज लागणा-या साबण, टूथपेस्ट आणि तेल या वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या बाबतची माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या वस्तूंवर अगोदर २९.३ टक्के इतका जीएसटी लागत होता. आता या वस्तूंवर १८ टक्के जीएसटी लागणार आहे.
दररोज लागणा-या या वस्तूंवरील जीएसटी कमी केल्यामुळे या वस्तूंची किंमत कमी होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे.