जळगाव येथे राज्यस्तरीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेला उत्साहात सुरुवात

जळगाव दि. २३ प्रतिनिधी – तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या एकमेव अधिकृत राज्य संघटनेकडून आयोजित ३३ वी महाराष्ट्र राज्य सीनियर तायक्वांदो स्पर्धेला मंगळवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेतील विजेते खेळाडू आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी व  केरळ येथील ‘खेलो इंडिया’ वुमेंस लीग साठी निवडले जाणार असल्याने या राज्य स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जवळपास ३०० खेळाडूंनी महाराष्ट्रातून या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या एकमेव राष्ट्रीय खेळ संघटनेस इंडियन ऑलिंपिक असोसिएशन (IOA) व भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिलेली असून महाराष्ट्रामध्ये तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या अधिकृत राज्य संघटनेने जळगाव येथील राज्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने जळगाव येथील शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य सीनियर तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, (ता. 22) ला युवा उद्योजक सागर चौबे, सौरभ चौबे, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा तांत्रिक समिती प्रमुख प्रवीण बोरसे, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा, जळगाव जिल्हा संघटनेचे सचिव तथा राज्य संघटनेचे सदस्य अजित घारगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. पुरुषांच्या आठ व महिलांच्या आठ वजनी गटांमध्ये या स्पर्धा जागतिक संघटनेच्या नवीन नियमानुसार सेंसर वर पार पडत आहेत. क्योरोगी व पुंमसे या दोन्ही प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडतील. फ्री स्टाइल पुंमसेचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

जागतिक संघटनेच्या नवीन नियमासह नव्याने राष्ट्रीय पंच परीक्षा व रिफ्रेशर सेमिनार उत्तीर्ण राष्ट्रीय पंचांच्या मदतीने या स्पर्धा पार पडतील. सर्व वजन गटातील सुवर्णपदक विजेते खेळाडू ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, शिवाय यावर्षी गोवा येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असल्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला दोन्ही संघ पात्र करणे हे खेळाडूंची प्राथमिकता असेल. पहिल्या दिवशी मुलींच्या गटातील स्पर्धा पार पडल्या. यामध्ये पुणे जिल्हा संघाचे वर्चस्व राहिले. यामधील सुवर्णपदक विजेत्या मुली आसाम येथे होणारे राष्ट्रीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील तर सुवर्णपदक व रौप्यपदक विजेत्या प्रत्येक वजन गटातील दोन खेळाडू केरळ येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ‘खेलो इंडिया’ वुमेन्स लीग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

मुलींचे निकाल – ४६ किलो वजन गट– सुवर्णपदक- साक्षी पाटील (पुणे), रौप्यपदक- स्वरूपा कोठावळे (औरंगाबाद), कास्यपदक- श्वेता खिळे (मुंबई) व अमिना शेख (ठाणे) ४९ किलो वजन गट – सुवर्णपदक- मृणाल वैद्य (पुणे), रौप्यपदक – वंशिका पटेल (मुंबई उपनगर), कांस्यपदक- अशिता चाफळकर (अमरावती) व सायली गर्जे (सांगली), ५३ किलो वजन गट – सुवर्णपदक- निशिता कोतवाल (पुणे), रौप्यपदक- नयन बारगजे (बीड), कास्यपदक- श्रुती चव्हाण (रत्नागिरी) व मेघना पाटील (ठाणे), ५७ किलो वजन गट- सुवर्णपदक- श्रुतिका टकले (पुणे), रौप्यपदक- वसुंधरा चेडे (ठाणे), कास्यपदक- कोमल पवार (कोल्हापूर) व प्रियंका पल्हाड (औरंगाबाद) ६२ किलो वजन गट- सुवर्णपदक- भारती मोरे (पुणे) रौप्यपदक- गायत्री बिनवडे (मुंबई उपनगर) , कास्यपदक -विनायकी धडके (पालघर) व समृद्धी सांगळे (औरंगाबाद) ६७ किलो वजन गट– सुवर्णपदक- वंशिका रानोट (ठाणे), रौप्यपदक- मनीषा गुटेकर (पुणे) कांस्यपदक- प्रतीक्षा देवरे (अहमदनगर), व गौरी कुमावत (जळगाव) ७३ किलो वजन गट- सुवर्णपदक- अनामिका डेका (ठाणे), रौप्यपदक- श्रेया पारडकर (औरंगाबाद), कांस्यपदक -प्रणिता शिंदे (पुणे) व करिष्मा सिंग (पालघर) ७३ किलो वरील वजन गट- सुवर्णपदक – नम्रता तायडे (पुणे), रौप्यपदक- महालक्ष्मी कांडेकर (पालघर), कास्यपदक- राधिका शर्मा (औरंगाबाद) व नामबी कोणार ( ठाणे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here