ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, पोल्युशनची वैधता वाढवली

नवी दिल्ली : कोरोना विषाणू्च्या संसर्गामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात अनेक उद्योग व्यवहार बंद आहेत. पार्श्वभूमीवर मोटार वाहनांशी संबंधित फिटनेस, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आरसी, पोल्युशन सर्टिफिकेट यासारख्या वाहनांच्या वैधतेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मुदत संपणा-या वाहनांच्या कागदपत्रांचे रिन्युअल करण्यासाठी वाहनधारकांना अवधी आणि दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मोटार वाहनाशी संबंधित कागदपत्रांची मुदत संपलेल्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. मुदत संपलेल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाची वैधतासुद्धा आता ३१ डिसेंबर २०२० ग्राह्य धरण्यात येणार आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लॉकडाऊनदरम्यान एका आदेशान्वये या कागदपत्रांची वैधता ३० जून २०२० पर्यंत वाढवली होती.

मात्र जून महिन्यापर्यंत परिस्थितीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता या मुदतीत सरकारने पुन्हा वाढ केली असून ती मुदत डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here