सिनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा – जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या पुष्पक महाजनला सुवर्ण

जळगाव : तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक २२ ते २३ ऑगस्ट रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हाॅल येथे ३३ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा संघ सहभागी झाला होता यामध्ये पुरुषांच्या ८७ किलो आतील वजन गटात पुष्पक रमेश महाजन याने सुवर्ण पदक पटकावले त्याने प्रथम फेरीत रत्नागिरी नंतर संभाजीनगर, सबमुबंई, व अंतिम फेरीत ठाणे चा सनी कंक यांच्यावर मात करून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरले व आसाम येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा संघात स्थान निश्चित केले त्याला प्रशिक्षक जयेश बाविस्कर (  NIS COACH ) याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले.

पुरूषांच्या इतर वजनी गटात ५४ किलो आतील निलेश पाटील, ६८ किलो आतील रोहन लोनारी, ८७ किलो वरील हेमंत गायकवाड यांनी रौप्य पदक  पटकावले तर महिलांच्या ६७ किलो आतील वजन गटात गौरी कुमावत हिने कांस्यपदक पटकावले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे, जिवन महाजन रावेर, जयेश कासार, श्रीकृष्ण चौधरी, हरिभाऊ राऊत यांनी सर्व पदक विजेते खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here