स्वस्तात सोने देण्याच्या आमीषाने पुन्हा लुटमार

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील विसापूर फाटा (ता. श्रीगोदा) येथील चौघांच्या हत्याकांडाची शाई अजून वाळलेली नाही. या हत्याकांडाला अजुन जेमतेम पाच दिवस झाले असून तपास सुरुच आहे. तेवढ्यात स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून महिलेची लुटमार करण्याचा नवा प्रकार उघडकीस आला. महत्वाची विशेष बाब म्हणजे या गुन्ह्यातील आरोपी हे गुरुवारी चौघांची हत्या झालेल्यांचे नातेवाईक आहेत. याप्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चौघांची हत्या होण्यापुर्वी याच टोळीतील काहीजणांनी १८ ऑगस्ट रोजी विसापूर रेल्वे गेटनजीक वाशीम येथील एका महिलेला स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवले होते. त्या महिलेच्या सोबत आलेल्या पुरुषांना मारहाण करून लुटमार करण्यात आली होती.

बेलवंडी पोलीस स्टेशनला सविता रतन बनसोड (३०) रा. काटा, जि. वाशिम या महिलेने फिर्याद दाखल केली आहे. सविता बनसोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंभू कुंज्या चव्हाण व चिमणी शंभू चव्हाण (दोघे रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील दोघे आरोपी विसापूर फाटा येथे हत्याकांड झालेल्यांचे नातलग आहेत. लुटमार करणाऱ्या या टोळीने वाशीम येथील रहिवासी असलेल्या सविता बनसोड यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत १८ ऑगस्ट रोजी विसापूर रेल्वे गेटजवळ बोलावले होते.

यावेळी सविता बनसोड यांच्यासोबत एक वाहनचालकाव्यतिरिक्त अजून एक जण होता. यावेळी सविता बनसोड यांनी सोने घेण्यासाठी पैसे सोबत आणले नव्हते. दरोडेखोरांना हे समजल्यामुळे त्यांनी सविता बनसोड व त्यांच्या सोबत आलेल्या इसमास मारहाण व लुटमार करण्यास सुरुवात केली. या लुटमारीत सविता बनसोड यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here