जळगाव : जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकृष्ण पाटील असे असे अमळनेर येथील जखमी तरुणाचे नाव आहे. जखमी तरुणाचा मित्र रतीलाल सुभाष पाटील याने या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
10 सप्टेबर रोजी रात्री रामकृष्ण पाटील या तरुणास मंगळग्रह मंदीर रस्त्यावर सनी सुरेंद्र अभंगे, सचिन सुरेंद्र अभंगे व ज्योती जितेंद्र अभंगे (तिघे रा. कंजरवाडा चोपडा रोड अमळनेर) या तिघांनी जुन्या वादातून शिवीगाळ करत धारदार चाकूने वार करुन गंभीर दुखापतकेली. लोखंडी रॉड, सळई आणि चाकूचा या हल्ल्यात वापर करुन त्यास जीवे ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विकास शिरोळे करत आहेत.