जळगाव : अगोदर विस हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर राहिलेल्या दहा हजारापैकी तडजोडीअंती आठ हजाराच्या मोहात पडलेला फौजदार एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. जयवंत प्रल्हाद पाटील असे पारोळा पोलिस स्टेशन येथे कार्यरत आणि एसीबीच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस उप निरीक्षकाचे नाव आहे.
या सापळा घटनेतील तक्रारदारासह त्याच्या नातेवाईकांवर पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नंबर 344/2023 भादवि कलम 324,323,341,342, 427, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदारासह त्याच्या नातेवाईकांची अटक टाळण्यासह न्यायालयात दोषारोपपत्र लवकर पाठवण्याच्या मोबदल्यात फौजदार जयवंत पाटील याच्याकडून तिस हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
या लाचेचा विस हजार रुपयांचा पहिला टप्पा अगोदर घेण्यात आला. त्यानंतर राहिलेल्या दहा हजार रुपयात फौजदार फौजदार जयवंत पाटील यांचा जीव गुंतला होता. त्या दहा हजार रुपयांच्या मोहात पडून घासाघीस करण्यात आली. तडजोडीअंती आठ हजार रुपये स्विकारतांना एसीबीच्या सापळ्यात अडकण्याची घटना घडली.
एसीबीचे पोलिस उप अधिक्षक तथा सापळा पर्यवेक्षण अधिकारी सुहास देशमुख यांच्यासह पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी एन. एन . जाधव यांच्यासह सापळा पथकातील पो.ना. बाळू मराठे, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. सचिन चाटे आदींनी सहभाग घेतला. या पथकाला पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्यासह सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. प्रणेश ठाकुर आदींनी सहकार्य केले.