लग्नासाठी तरुणीचा तरुणावर चाकू हल्ला

On: September 17, 2023 10:47 AM

जळगाव : लग्न करण्यास नकार देणा-या तरुणावर चाकू हल्ला करणा-या तरुणीविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश दिलीप बोरसे असे पाचोरा येथील जखमी तरुणाचे नाव आहे. जखमी निलेश बोरसे याच्या बहिणीने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकू हल्ला करणा-या तरुणीसोबत जखमी निलेश बोरसे याचे प्रेमसंबंध होते. मात्र दोघात मतभेद झाल्यानंतर तरुणीने निलेश विरुद्ध सन 2021 मधे बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. ती त्यास लग्न करण्यास सतत त्रास देत होती आणि निलेश तिच्यासोबत लग्न करण्यास नकार देत होता. याचा उद्रेक झाल्याने हा चाकू हल्ल्याचा प्रकार घडला. यात निलेशच्या मानेवर आणी हातावर जखम झाली.

15 सप्टेबरच्या रात्री चाकू हल्ल्यात निलेशचा बचाव करण्यासाठी आलेल्या त्याच्या आईवडील आणि भाऊ यांना तरुणीने अश्लिल शिवीगाळ केली. मी सर्वांचा मर्डर करुन टाकेन अशी धमकी तरुणीने यावेळी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल मोरे करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment