जळगाव : जळगाव शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टर महिलेस कॉंग्रेस भवन नजीक भर रस्त्यावर तिघांनी अश्लिल शिवीगाळ तसेच स्कुटीवरुन मुलीसह खाली पाडण्याचा प्रकार घडला. या घटने प्रकरणी तिघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील महाबळ रस्त्यालगत राहणा-या एका डॉक्टर महिलेचा नवीपेठ परिसरात राहणा-या एका महिलेसोबत काही वाद असल्याचे समजते. नवीपेठ परिसरात राहणा-या महिलेसह दोघे जण फुले मार्केट – कॉंग्रेस भवन परिसरात 20 सप्टेबर रोजी उभे होते. त्यावेळी डॉक्टर महिला आपल्या मुलीसह स्कुटीने तेथून जात असतांना तिघांनी त्यांना अडवले.
तु या महिलेच्या मॅटरमधे पडू नको नाहीतर….. ….असे म्हणत अतिशय अश्लिल शिवीगाळ करत तिघांनी डॉक्टर महिलेस मारुन टाकण्याची धमकी दिली. डॉक्टर महिलेच्या उभ्या स्कुटीला लाथ मारुन मुलीसह खाली पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटने प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. किशोर पवार करत आहेत.