जळगाव, दि. १० (प्रतिनिधी) – येथील स्वाध्याय भवन येथे काल दि. ०९ ऑक्टोबर रोजी होमिओपॅथी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात ११५ जणांवर इलाज करण्यात आला. सकाळी साडे दहा ते साडेचार वाजेच्या दरम्यान विविध आजार असलेल्या रुग्णांनी आपली प्रकृती तपासून घेतली व आजारावर उपचार करून घेतला.
मध्यप्रदेशातील मंडलेश्वर येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. निधि जैन हे गेल्या अनेक वर्षांपासून परमपुज्य गुलाब मुनीजी महाराज साहेब यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने स्वयंस्फूर्तीने त्यांचा भारतात जिथेही चातुर्मास महोत्सव असतो तिथे जाऊन रुग्णांसाठी मोफत होमिओपॅथी शिबीर आयोजित करून आपल्या गुरुंच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतात. या शिबीराचे उद्घाटन विजयराज कोटेचा यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. निधि जैन, अजय राखेचा, अनिल कोठारी (सीए), आशिष भंडारी, तेजस कावडीया उपस्थित होते. भुसावळ येथील डॉ. पूजा गादिया, रुपाली प्रजापत यांचे शिबीरासाठी सहकार्य लाभले. एकाच वेळी रुग्णांची गर्दी होऊ नये याची काळजी घेत आधी नाव नोंदणी करून त्यांना भेटीच्या वेळा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अत्यंत शिस्तीने हे शिबीर संपन्न झाले.