जळगाव : चोरट्यांची वक्रदृष्टी आता इलेक्ट्रीक डीपीवरील फेज आणि ऑईलवर देखील पडली असून इलेक्ट्रीक विभागाशी संबंधीत वस्तूदेखील चोरी होण्यास सुरुवात झाली आहे. याप्रकरणी अनुक्रमेचाळीसगाव ग्रामीण आणि पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आहेत.
शेती पंपाला विज पुरवठा करणा-या विज वाहिनीवरील रोहित्रावरील लघू दाब वाहीनीचे एकुण तिन फेज चोरी झाले आहेत. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गु.र.न. 369/23 भा.द.वि. 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हे.कॉ. विजय शिंदे करत आहेत. दुस-या घटनेतील पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे या गावी 2 लाख 20 हजार 750 रुपये किमतीचे डीपीचे ऑइल आणि तांब्याची तार असे साहित्य चोरी झाले आहे. या प्रकरणी गु.र.न. 372/23 भा.द.वि. 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार प्रकाश पाटील करत आहेत.