भूलाबाई महोत्सवात मोठ्या गटासाठी अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रथम पुरस्कार

जळगाव, दि. 12, (प्रतिनिधी) – केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित, ललित कला संवर्धिनी आयोजित जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव २०२३ मधे अनुभूती इंग्लीश मीडिअम स्कूलच्या  (माध्यमिक) मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शाळेतील ५,वी ते ८ व्या इयत्तेच्या  १४ विद्यार्थींनी सहभाग घेतला होता. त्यात प्रतिज्ञा चौधरी, हर्षिता निकुंभ, अमृता भोई, तनुजा पाटील, राशी दाभाडे, आरुषी सोलसे, उर्वशी सपकाळे, चिन्मयी सोनवणे, खुशी बागुल, कोमल सपकाळे, भूमिका चौधरी, अवनी भोईटे, चिन्मयी जंजाळकर, यशोदीप थोरात या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. छत्रपती संभाजे राजे नाट्यगृहात आयोजित या स्पर्धेनंतर विजेत्या संघाचा यथोचित सन्मान करण्यात आला. 

रविवार दि.८ऑक्टॊबर २०२३ रोजी संपन्न झालेल्या  मोठ्या गटात आपल्या जिल्हातून १५ संघानी सहभाग नोंदवीला होता. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचे प्रोत्साहन व अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम बसविण्यात आला. त्यासाठी  पुनम पाटील  यांनी गीत लेखन केले, संगीत शिक्षक भुषण खैरनार यांनी गाण्याची चाल लावली, नृत्य शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी नृत्य बसवले आणि विद्यार्थीनी अत्यंत सुंदर असे सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here