जळगाव : सुरुवातीला एक रुपया जमा झाल्याचा मेसेज, त्यानंतर दहा हजार, विस हजार, तिस हजार रुपये खात्यात जमा झाल्याचे वेगवेगळे नकली मेसेज पाठवून महिलेची दिशाभूल करुन फसवणूक केल्याची घटना रावेर तालुक्यात उघडकीस आली आहे. नजरचुकीने आपल्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे भासवून ते पैसे विविध खात्यावर जमा करण्यास सांगून तब्बल 63 हजारात महिलेची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला तिघा मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील एका गृहीणीच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. या महिलेला पलीकडून सुरुवातीला एक रुपया जमा झाल्याचा मेसेज वाचण्यात आला. एकंदरीत या गोलमाल आणि दिशाभुल करण्याच्या फंड्यात भोळ्याभाबड्या लोकांसह सुशीक्षीत लोक देखील फसतात. प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा झाले आहेत का? याची खात्री महिलेने खात्री केली नाही. केवळ मेसेज वाचून पैसे जमा झाल्याचा भास निर्माण झाल्याने विविध खात्यावर महिलेने पैसे फोन पे आणि गुगल पे च्या माध्यमातून तिघा मोबाईल धारकांच्य खात्यावर वर्ग केले. या प्रकाराला बळी पडून रावेर तालुक्यातील महिलेची फसवणूक झाली.