मुंबई : नवीन घर घेणाऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. ३१ डिसेंबरपर्यंत घर खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात केली जाणार आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुंबईसह मोठ्या शहरात घर घेणाऱ्यांना सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. घर खरेदीच्या वेळी आकारण्यात येणाऱ्या स्टॅम्प ड्युटीत कपात करण्यात आली आहे. ही स्टॅम्प ड्युटी ५ टक्के लागत होती. ती आता २ टक्क्यांवर येणार आहे. ही सवलत केवळ ३१ डिसेंबरपर्यंत असेल. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत ही स्टॅम्प ड्युटी ३ टक्के असेल. त्यामुळे सुस्ती आलेल्या रिअल इस्टेट व्यवसायाला चालना मिळणार आहे.
घर खरेदी करणा-या नागरिकांना हा एक चांगला निर्णय म्हटला जात आहे.मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई महापालिका वगळता मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगरपालिका व ७ नगरपालिका क्षेत्रासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता देण्याचा निर्णय यावेळी झाला.