जळगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पराभव झाल्याचा राग मनात ठेवून त्रयस्थ व्यक्तीच्या सांगण्यावरुन व्यावसायीकाच्या अंगावर भरधाव ट्रक घालून त्यास जीवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पहूर येथे उघडकीस आली आहे. इतरांचे अचानक लक्ष गेल्यामुळे व्यावसायीकाचा जीव वाचला मात्र मोटार सायकलींचे नुकसान झाले आहे.
जामनेर तालुक्यातील पहुर पेठ परिसरातील भारत गॅस एजंन्सीचे डिस्ट्रीब्युटर रामेश्वर बाबुराव पाटील यांच्या बाबतीत हा जीवघेणा प्रकार घडला आहे. रामेश्वर पाटील हे त्यांच्या परिचितांसह घरासमोर बोलत उभे असतांना भरधाव वेगात अशोक लेलॅंड कंपनीची ट्रक त्यांच्या अंगावर घालण्यात आली. हा प्रकार अचानक लक्षात आल्याने पळापळ झाल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र रस्त्यावरील मोटार सायकलींचे नुकसान झाले. त्रयस्थ व्यक्तीच्या सांगण्यावरुन झालेल्या या घटने प्रकरणी ट्रक चालक मोसीन खान नवाब खान (रा. मालेगाव जिल्हा नाशिक) यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप करत आहेत.