मुलीचा घटस्फोट झाल्याचा आरोप करत लाठा काठ्यांनी मारहाण

On: November 21, 2023 10:56 AM

जळगाव : तुझ्यामुळे आमच्या मुलीचा घटस्फोट झाला असे म्हणत एकाच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकून त्यास लाठाकाठ्यांनी मारहाण केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे या गावी घडली. या घटनेप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला सहा जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्राम्हणशेवगे या गावी राहणा-या एकाच्या घरी सहा जण चाल करुन आले. तुझ्यामुळे आमच्या मुलीचा घटस्फोट झाला असा आरोप करत संबंधीत इसमाच्या डोळ्यात लाल मिरची पावडर फेकून महिला पुरुषांनी लाठाकाठ्यांनी बेदम मारहाण केली. जखमी इसमाच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक अशोक राठोड करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment