जळगाव : शासनाच्या मालकीचे गौण खनिज मुरुमाची अवैध वाहतुक करणा-या चौघांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. विक्की किशोर जाधव, विशाल किशोर जाधव, विक्की संतोष ललवाणी आणि चालक आदेश कैलास पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
3600 रुपये किमतीचा सहा ब्रास मुरुम, 18 लाख 35 हजार रुपये किमतीचे डंपर आणि मोटार सायकल असा एकुण 18 लाख 38 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमळनेर शहरातील कॉलनी परिसरातील ड्रिम सिटी भागात कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिस नाईक रविंद्र अभिमन पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सुरु आहे.