जळगाव : मानवी मेंदूवर विपरित परिणाम करणा-या गांजाची आपल्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड करुन संवर्धन केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एक पळून जाण्यात यशस्वी झाल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे. रवी किला-या पावरा हा फरार असून रोहीदास देवसिंग पावरा आणि राहुल किला-या पावरा हे दोघे अटकेत आहेत.
तिघे जण कसत असलेल्या उत्तम नगर भागातील शेतात 31 लाख 80 हजार रुपये किमतीचा सुमारे 795 किलो गांजा पोलिसांना मिळून आला. एक किलो गांजाची किंमत चार हजार रुपये मानली जाते. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गु.र.न. 198/23 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.