बंद घराचा कडीकोंडा तोडून दागिन्यांसह रोकड चोरी

On: November 29, 2023 10:20 AM

जळगाव : बंद घराचा कडीकोंडा तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 2 लाख 70 हजार 625 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरी केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दिड लाख रुपयांची रोकड आणि 1 लाख 20 हजार 625 रुपयांचे सोन्या दागिने व देव घरातील चांदीचे देव व इतर साहित्यांचा समावेश आहे.

जळगाव तालुक्यातील कंडारी येथील किराणा दुकानदार महेंद्र माधव परदेशी यांचे घर 17 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून कपाटातील तिजोरीतून रोकड व दागिने असा ऐवज चोरुन नेला. या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय जाधव करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment