दिपनगर विज प्रकल्पात चोरीसह दगडफेक – दोघे सुरक्षाकर्मी जखमी

जळगाव : दिपनगर औष्णिक विज निर्मिती केंद्रात साहित्याच्या चोरीसह दगडफेक करुन दोघा सुरक्षा रक्षकांना जखमी करणा-या चौघा अनोळखी हल्लेखोर तथा चोरट्यांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 डिसेंबरच्या रात्री सव्वा दोन ते पावणे तिन वाजेच्या सुमारास फेकरी रेल्वे क्रॉसिंग नजीक दिपनगर प्लॅंट कडून भुसावळच्या दिशेने जाणा-या एम. टी. रॅक मधे कुणीतरी अज्ञात चोरट्याने दिपनगर प्लॅंट परिसरातून रेल्वे वॅगनेचे नऊ लोखंडी साईड डोअर चोरी करुन आणले होते.

त्या चोरीच्या लोखंडी नऊ डोअरकडे विज केंद्राचे कनिष्ठ सुरक्षा अधिकारी अनिकेत काणेकर यांचे लक्ष गेले. त्यामुळे त्यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने ते डोअर त्यांच्या ताब्यातील वाहनात लोड करु लागले. त्याचवेळी एका लाल काळ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या पल्सर वाहनाने तिघे अनोळखी इसम आले.

आलेल्या तिघांनी अंधारात सुरक्षा अधिकारी अनिकेत काणेकर व त्यांच्या साथीदारांवर दगडफेक सुरु केली. या झटापटीसह दगडफेकीत जखमी दिलीप वराडे व राजेंद्र पाटील या दोघांचे मोबाईल त्यांनी हिसकावले. या घटने प्रकरणी चौघा अनोळखींविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक पुजा अंधारे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here