नागपाड्यात दुमजली इमारतीचा भाग कोसळला

On: August 27, 2020 3:43 PM

मुंबई : महाडच्या कोसळलेल्या इमारतीचा विषय ताजा असतांना आज मुंबईच्या नागपाडा भागातील इमारतीचा भाग कोसळल्याची अजुन एक घटना घडली. या घटनेत कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली काही लोक दबल्याची भिती व्यक्त केली जात आहे. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास मिश्रा इमारतीचा भाग कोसळला. या घटनेची माहिती मिळताच मनपा व अग्निशमन दलाच्या कर्मचारी वर्गाने धाव घेत मदतकार्य सुरु केले. तीन-चार जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment