विघ्नेश्वर गणपती मंदीरातील चोर अखेर अटकेत

जुन्नर : अष्टविनायक ओझरच्या श्रीमंत विघ्नेश्वर गणपती मंदिरात गेल्या महिन्यात चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेतील चोरांना पकडण्यात ओतूर पोलिसांनी आरोपींना मुद्देमालासह पकडले आहे.ओझरच्या विघ्नेहर गणपती मंदिरात 27 जुलै रोजी दीड किलो वजनाची चांदीची छत्री तसेच दानपेटीतील रक्कम चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेमुळे गणेशभक्तांची नाराजी लक्षात घेता पोलिसांनी कसून तपास सुरु केला होता.

ओझर गणपती मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमधे ही घटना कैद झाली होती. दोन जण चोरी करताना त्यात दृष्टीस पडत होते. ते दोघे चोरटे कोण आहे हे समजणे अवघड झाले होते. मात्र हा तपास गणेशोत्सवात लागला आणि गणेशभक्तांची नाराजी दूर झाली. आळेफाटा पोलिसांच्या मदतीने संदीप सखाराम पतवे व विठ्ठल महादू पतवे (रा.कळस खुर्द, ता.अकोले, जि.अहमदनगर) या दोघा चोरट्यांना पकडण्यात आले. त्यांना ओतूर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. पंधराशे रुपयांची रोकड व मंदिरातील चांदीची छत्री चेपवलेल्या अवस्थेत दोघा आरोपींनी त्यांच्या राहत्या घरी लपवली होती. तो मुद्देमाल पोलिसांकरवी हस्तगत करण्यात आला. उपविभागिय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. परशुराम कांबळे, पोलिस नाईक विकास गोसावी, पोपट मोहरे, हेड कॉंस्टेबल पंकज पारखे, देविदास खेडकर, नवनाथ कोकाटे या तपासकामी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here