जळगाव : दोन कट्टे व पंधरा काडतुसांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनीपेठ भागातून शिताफीने अटक केली आहे. नमीर खान (रा. काट्या फाईल जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अटकेतील नमीर खान याच्याविरुद्ध जिल्हापेठ आणी शनीपेठ पोलिस स्टेशनला शरीराविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. दोन कट्टे आणि पंधरा काडतुस जप्त करण्यात आलेल्या नमीर खान यास शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे समजते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील स.पो.नि. निलेश राजपूत, पोलिस उप निरीक्षक वाघमारे, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हे.कॉ. सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, किरण चौधरी, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.