आयशर चोरी करणा-यास पोलिस कोठडी

On: January 5, 2024 10:35 PM

जळगाव : सुमारे सोळा महिन्यांपुर्वी आयशर वाहन चोरी करणा-यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. समीर नसीर खान उर्फ पठाण असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला काशिमीरा (मिरा भाईंदर) पोलिस स्टेशनच्या ताब्यातून घेण्यात आले आहे. दिनांक 8 सप्टेबर 2022 रोजी रात्री जळगाव शहरातील रामनगर, मेहरुण परिसरातील सारा हॉस्पिटल समोरुन जावेद लतीफ पटेल यांच्या मालकीचे 19 लाख 50 हजार रुपये किमतीचे आयशर वाहन चोरी झाले होते. या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान समीर नसीर खान यास काशीमीरा पोलिस स्टेशनच्या ताब्यातून घेत अटक केल्यानंतर श्रीमती एम. एम. बडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने समीर खान यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. निखील कुलकर्णी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. चोरी झालेले आयशर वाहन गुन्हे शाखा कक्ष 01 काशिमीरा मीरा भाईदर पोलीस आयुक्तालय यांनी समीर नसीर खान उर्फ पठाण (मुळ रा. खंडाळा ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याकडुन जप्त केले होते. त्याच्याकडून अजून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, राहुल रगडे, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. हा गुन्हा घडल्यानंतर 15 महिन्यानंतर उघडकीस आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment