खूनाचा आरोपी पकडण्यात हे.कॉ. सुरज पाटील यांना यश

On: January 14, 2024 9:24 AM

जळगाव : भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे 13 जानेवारी रोजी झालेल्या तरुणाच्या खूनातील संशयीत आरोपीस पकडण्याकामी हे.कॉ. सुरज पाटील यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. रोशन बबन हुसळे असे संशयीत आरोपीचे तर भावेश भालेराव असे मयत तरुणाचे नाव आहे. आर्थिक वादाची किनार या खूनाला असल्याचे म्हटले जात आहे. या घटने प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

13 जानेवारीच्या दुपारी भावेश भालेराव या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आला. कोणताही मागमुस नसतांना खब-याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीवायएसपी पथकातील शिलेदार असलेले हे.कॉ. सुरज पाटील यांनी फेकरी उड्डान पुलानजीक उभ्या असलेल्या व परगावी पळून जाण्याच्या बेतात असलेल्या संशयीत आरोपी रोशन हुसळे यास शिताफीने ताब्यात घेत एकट्याने तालुका पोलिस स्टेशनला आणून वरिष्ठांसमोर हजर केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment