निलंबित पो.नि. किरणकुमार बकाले यांना दोन दिवस पोलिस कोठडी

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबीत पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले आज जळगाव पोलिस अधिक्षक कार्यालयात शरण आले. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत जवळपास दिड वर्षाच्या कालावधीत बकाले फरार होते. त्यांच्या अटकेसाठी वेळोवेळी मराठा समाजाने आंदोलन आणि निदर्शने देखील केले.

आज 15 जानेवारी रोजी सकाळी बकाले पोलिस अधिक्षक कार्यालयात शरण आले. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्यामुळे न्यायालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसुन आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना न्या. जे.एस. केळकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या समक्ष हजर करण्यात आले. न्या. जे.एस. केळकर यांच्यासमक्ष यावेळी दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर बकाले यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here