इश्वरने गोड बोलून फसवले भोळ्या दामिनीला — शरीरसंबंध केले परंतू नकार दिला संसाराला!!

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : जळगाव येथे राहणारी दामिनी (काल्पनिक नाव) नोकरीनिमीत्त पुणे येथे राहण्यास गेली होती. जळगावच्या दामिनीची तिच्या पतीसोबत पंच फारकत झाली होती. माहेर असलेल्या जळगाव शहरासोबत साहजीकच तिची नाळ जुळलेली होती. त्यामुळे ती जळगावला अधूनमधून येत होती. नेहमीप्रमाणे ती जळगावला आली होती. जळगाव शहरातील एका बड्या खासगी बॅंकेत तिला खाते उघडायचे होते. बॅंकेत खाते उघडण्यासाठी ती जिल्हापेठ परिसरातील एका बड्या खासगी बॅंकेत गेल्यावर्षी आली होती. बॅंकेतील इश्वर गोविंदा व्यास नावाच्या कर्मचा-यासोबत बॅंकींग कामानिमीत्त तिची ओळख  झाली. दामिनीची “फेस व्हॅल्यु” इश्वर यास तोलामोलाची वाटली. त्यामुळे त्याने तिला साधे खाते उघडण्यासाठी पराकोटीची मदत  केली. त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले.   

काही दिवसांनी इश्वरचा तिला कॉल  आला. आमच्या बँकेकडून विमा काढा अथवा मुदतठेव तरी ठेवा असे तो तिला अजीजीने म्हणाला. मात्र आपल्याला विमा काढायचा नाही अथवा मुदत ठेव  देखील ठेवायची नाही, मला  क्रेडीट कार्ड काढायचे आहे असे  दामिनी त्याला म्हणाली. काही का असेना दामिनीने आपले बॅंकींग प्रॉडक्ट घेण्यात इंटरेस्ट दाखवला हे बघून तो मनातल्या मनात सुखावला. “मी ऑफ़र  चेक  करुन सांगतो असे म्हणत इश्वरने दामिनीला आश्वस्त केले. त्यानंतर तो तिच्यासोबत कधी  बॅंकेच्या तर  कधी स्वत:च्या व्यक्तीगत गोष्टींसाठी तिला वारंवार कॉल करु  लागला आणि  तिच्यासोबत जवळीक साधू लागला. अशा प्रकारे दोघांच्या गुफ्तगूचा प्रवास सुरु झाला.

दामिनी इश्वरपेक्षा वयाने दोन वर्षाने मोठी होती. इश्वर तिच्यापेक्षा वयाने लहान होता. तरी देखील तो तिच्या प्रेमात पडला. बघता बघता तो तिच्यसोबत एकेरी लाडीक भाषेत बोलू लागला. “तु मला  खुप  आवडतेस, माझे तुझ्यावर खुप  प्रेम आहे” हे नेहमीच्या ठराविक साच्यातील मजनूछाप डॉयलॉग त्याने सुरु केले. अशा  संवादातून त्याने तिला प्रपोज करण्यास सुरुवात केली. त्याने तिला स्पष्ट सांगितले की “मला कोणत्याही प्रकारचा टाईमपास करायचा नाही, माझे अगोदरच लग्न झालेले आहे”. त्यावर तो तिला म्हणाला की, तुझे लग्न झाले आहे हा तुझा भुतकाळ होता. मला तुझ्या भुतकाळाशी काही देणेघेणे नाही. मला  तु आवडते. मी तुझ्यावर प्रेम करतो. तु फक्त माझा विचार कर,  मी  फक्त तुझा विचार करतो. असे  बोलून त्याने तिला भावनिक साद तर घालत प्रेमाच्या अथांग सागराच्या मध्यभागी नेण्याचा प्रयत्न केला. त्यावर ती त्याला म्हणाली की मी तुझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठी आहे. त्यावर तो तिला म्हणाला की  प्रेमात वयाची बंधने नसतात. अभिषेक बच्चन हा देखील ऐश्वर्या रॉय पेक्षा लहान बाळ आहे. त्यामुळे आपल्या वयातील अंतराचा मुद्दा विसरुन जा. एनकेन प्रकारे त्याने तिला प्रपोज करण्याचा जीव तोडून प्रयत्न सुरुच ठेवला.  तु फक्त माझा विचार कर  मी फक्त तुझा विचार करतो. या जगाला विसरुन जा. या  जगात केवळ आपण दोघेच जण वास्तव्य करत  आहोत असे  समजून माझ्यावर प्रेम कर.  मला  तुझ्या प्रेमाची नितांत गरज आहे  असे  गोड  बोलून बोलून त्याने तिला जेरीस आणले.

एके  दिवशी त्याने त्याची आई ज्योती व्यास यांच्यासोबत तिचे बोलणे करुन दिले. तु इतर कामासाठी माझ्या आईसोबत संपर्क कर असे  म्हणत त्याने तिला विश्वासात घेण्यास सुरुवात केली. आपल्या दोघात बरीच जवळीक निर्माण झाल्याचे बघून तो तिला आता पैशांची देखील मागणी करु  लागला. तो तिला महागड्या वस्तू मागू लागला. ती देखील त्याला महागड्या वस्तूंची खरेदी करुन देऊ  लागली. आपली हौस दामिनीकडून पुर्ण होत असल्याचे बघून इश्वर मनातल्या मनात सुखावला. हौस  करायचा इश्वर आणि  त्याची त्या हौसेची पुर्तता करायची दामिनी असा उलटा प्रकार सुरु झाला होता.

मुळ  जळगाव येथील दामिनी कामानिमीत्त पुणे येथे रहात होती. मात्र इश्वरच्या विनंतीवरुन ती जळगावला अधूनमधून येत होती. एके दिवशी रात्रीच्या अंधारात तो तिला नेहरु चौकातील खानदेश सेंट्रल मॉल  परिसरात घेऊन गेला. तेथील एका बंद संकुलाच्या आडोशाला तो तिला घेऊन गेला. याठिकाणी एकांताचा गैरफायदा घेत  त्याने तिच्या विशीष्ट अवयवांना हात  लावण्यास सुरुवात केली. त्याची भीड चेपत असल्याचे बघून तिने त्याला फटकारले. रागाच्या भरात ती तेथून निघून गेली. त्यानंतर तिने त्याच्यासोबत एकांतात जाणे टाळले. 

त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले. नेहमीप्रमाणे कॅलेंडरच्या तारखा बदलत होत्या, पुलाखालून बरेच पाणी वाहून जात होते. दिवसामागून दिवस जात असल्याने दोघातील कमी अधिक तणावाचे वातावरण सौम्य झाले. एके दिवशी त्याने त्याच्या क्रेडीट कार्डचे बिल भरण्यासाठी तिला विस  हजार रुपये मागितले. त्याच्यावर विश्वास ठेवत तिने ते पैसे इश्वरच्या भावाच्या खात्यावर वर्ग केले.

एके दिवशी त्याने तिला जणूकाही शॉकच दिला. माझे मामा मनोज तिवारी आणि मोठे वडील हे माझ्यासाठी स्थळ शोधत आहेत असे  तो तिला म्हणाला. आतापर्यंत आपण  त्याला महागड्या वस्तू खरेदी करुन दिल्या. त्याच्या विनंतीवरुन पुणे येथून जळगावला त्याला भेटण्यासाठी प्रवास केला. आतापर्यंतचे आपले सगळे कर्म पाण्यात गेले, मातीत मिसळले गेले असे  तिला वाटले. इश्वरच्या विनंतीवरुन आपण त्याच्यावर प्रेम केले. आता तोच इश्वर नातेवाईकांसोबत स्वत:साठी स्थळ बघण्यासाठी जात असल्याचे ऐकून तिच्या नजरेसमोर दिवसाढवळ्या काजवे चमकू लागले. त्यामुळे तिने त्याला चांगलेच फैलावर घेतले.

मी आईवडील आणि मामांसोबत नॉमिनल उपचार निभावण्यासाठी  हैद्राबादला स्थळ बघण्यास जात असल्याचे सांगून त्याने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिचा रुद्रावतार बघून त्याने देखील रडवेल्या स्वरात मी तुझ्यावरच प्रेम करतो असे म्हणत तिला भावनिक करुन शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघातील फोनवरील वाद कसाबसा शांत झाला. काही दिवसांनी पुन्हा त्याने रडक्या आवाजात तिला फोन  केला. मला  लग्नाबाबत निर्णय घ्यायचा आहे, त्यासाठी मी तुला भेटण्यासाठी पुणे येथे येतो असे तो तिला म्हणाला.

त्याचा फोनवरील रडका आवाज ऐकून तिने त्याला पुणे येथे तिला भेटण्यासाठी येण्यास परवानगी दिली. ऑगस्ट 2023 या  कालावधीत तो पुणे येथे तिच्या भेटीसाठी गेला. आता मला  चार  ते  पाच  दिवस सलग  सुट्या आहे त्यामुळे मी तुझ्याकडेच मुक्काम करतो असे म्हणत त्याने ती रहात असलेल्या निवासस्थानी मुक्काम ठोकला. या मुक्कामात त्याने तिच्याकडून स्वत:सह त्याच्या आईसाठी शुज व कपडे घेतले. या वस्तूंचे बिल  दामिनीनेच रोख स्वरुपात अदा केले. एवढे कमी  झाले म्हणून की काय त्याने त्याच्या अंगावर सोळा हजार रुपयांचा टॅटू काढला. ते  सोळा हजार रुपये देखील दामीने अदा केले.

या पुणे मुक्कामात दामिनीची संमती नसतांना त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. यावेळी ब्ल्यु फिल्ममधे दाखवतात तसला प्रकार त्याने तिला करण्यास भाग पाडला. याप्रकारामुळे दामिनी आजारी पडली. त्यामुळे ती  वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाली. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असतांना इश्वर तिला सोडून जळगाव येथे निघून आला.

दामिनीकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेण्यासह तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर त्याने तिचे फोन रिसिव्ह करणे बंद  केले. एके दिवशी इश्वरने दामिनीला फोन  करुन सांगितले की माझ्यापालकांनी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ते  माझ्यावर हैद्राबाद येथील मुलीसोबत लग्न करण्यास दडपण टाकत आहेत. मी त्यांच्या मनाच्या समजुतीसाठी त्या मुलीसोबत साखरपुडा करतो मात्र माझे तुझ्यावरच प्रेम आहे. दरम्यान वैद्यकीय उपचारातून बरी झाल्यानंतर दामिनीने जळगाव गाठले.

जळगावला आल्यानंतर तिने थेट  इश्वर काम करत असलेली बॅंक गाठली. तो तिच्यासोबत नेहमीप्रमाणे मनमोकळा बोलत नव्हता. तिने त्याला चर्चा करण्यासाठी बॅंकेच्या बाहेर येण्यास सांगितले. बॅंकेत सर्वांसमोर देखावा नको असा विचार करत  तो बॅंकेच्या बाहेर आला. बॅंकेच्या बाहेर येताच दामिनीने आपले रणरागिणीचे रुप त्याला दाखवण्यास सुरुवात केली.

“तु माझ्याकडून केवळ पैसे घेण्यासह शरीरसुखासाठीच प्रेम केले का?” असा खडा  सवाल तिने त्याला केला. आता मी पोलिस स्टेशनला जावून तुझ्याविरुद्ध तक्रारच दाखल करते असा सज्जड दम  देखील तिने त्याला दिला. तिचा रुद्रावतार बघून इश्वरने त्याची पडती बाजू सावरण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. “मी हैद्राबाद येथील मुलीसोबत केलेला साखरपुडा मोडलेला आहे” असे  सांगून त्याने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दामिनी कशीबशी शांत झाली.

त्यानंतर दामिनीसोबत नोंदणी विवाह करण्यासाठी त्याने आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. आपण नोंदणी पद्धतीने विवाह करु असे  म्हणत त्याने तिला आश्वस्त केले. दुय्यम निबंधक विवाह कार्यालयात नोंदणीच्या वेळी पहिल्या लग्नाबद्दल काहीही सांगायचे नाही अशी  त्याने तिला अट  घातली. त्याच्या म्हणण्यानुसार तिने इश्वरसोबत आपला पहिला विवाह असल्याचे नोंदणी विवाह कार्यालयात नोंद करतांना नमुद केले.

इश्वरने दामिनीसोबत विवाहासाठी नोंदणी केल्याची माहिती त्याची आई, मोठे वडील व मामांना समजली. या माहितीची खबर  लागताच त्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिने या  सर्वांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी 22 ऑक्टोबर 2023 रोजी जळगाव शहर पोलिस स्टेशनची वाट धरली. दामिनी जळगाव शहर  पोलिस स्टेशनच्या वाटेवर असतांनाच तिची वाट इश्वरचे मामा मनोज तिवारी व त्याच्या काही मित्रांनी अडवली. सर्वांनी तिला गळ घालून कोणत्याही प्रकारची तक्रार करु नको अशी विनवणी केली. आम्ही तुम्हा दोघांचे लग्न लावून देतो असे  तिला आश्वस्त करण्यात आले.

त्यानंतर इश्वर व्यास याच्यासह त्याचे मोठे वडील, आई ज्योती व्यास, मामा मनोज तिवारी यांनी तिच्यासोबत वेळोवेळी वाद घालण्यास सुरुवात केली. दामिनीने देखील इश्वरने तिच्यासोबत केलेल्या कर्माचा पाढा वाचून दाखवला. कशा प्रकारे त्याने खान्देश सेंट्रल मॉल  परिसरातील बंद  दुकानाच्या आडोशाला रात्रीच्या अंधारात विशिष्ट अवयवांना हात  लावला, पुणे येथे तिच्या निवासस्थानी कशा प्रकारे शरीरसंबंध प्रस्थापित केले, कशा प्रकारे विविध कारणांसाठी विविध महागड्या वस्तूंसाठी दोन  लाख रुपये घेतले त्याचा पाढाच वाचून दाखवला. आपली पंच  फारकत झाली असल्याचे देखील तिने इश्वरसह त्याचे मोठे वडील, आई व मामा यांना कथन  केली.

दामिनीची दर्दभरी दास्तान ऐकल्यानंतर  इश्वरसह त्याचे मोठे वडील, आई, मामा हे तिच्यापासून काही अंतरावर गेले. त्या सर्वांनी आपसात काही वेळ गहन चर्चा केली. त्यानंतर सर्वजण पुन्हा तिच्याजवळ आले. आम्ही तुम्हा दोघांचे लग्न लावून देतो, तु कोणतीही तक्रार पोलिसात देऊ नको. तुझ्या अशा  कृत्यामुळे आमची समाजात बदनामी होईल असे म्हणत त्यांनी तिला समजावत तिचा विश्वास संपादन करण्यास सुरुवात केली. तुझे इश्वरसोबत लग्न लावून दिल्यानंतर तु पुणे येथून तुझे सर्व सामान जळगावला घेऊन ये.  तुम्हा दोघांची एकत्र राहण्याची आम्ही सोय  करुन देतो असे  तिला सांगण्यात आले.

त्यानंतर दि. 3 नोव्हेंबर 2023 रोजी जळगाव येथील दुय्यम निबंधक तथा विवाह निबंधक कार्यालयात दोघांचे लग्न लावण्यात आले. यावेळी इश्वरचे मामा मनोज तिवारी यांच्यासह त्याचे काही  मित्र उपस्थित होते. लग्नानंतर इश्वर तिला घरी  घेऊन गेला नाही. तिने त्याच्यासोबत संसार करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र त्यात तिला यश आले  नाही. तिच्या स्वभावाचा  गैर फायदा घेत तिच्यासोबत केवळ नोंदणी विवाह झाला मात्र संसार सुरु झाला नाही. आपली फसवणूक झाली, आपला विनयभंग झाला, आपला छ्ळ  झाला, आपल्यावर बलात्कार झाला या विविध घटकाखाली तिने पोलिस स्टेशनला तक्रार देण्याचे निश्चित केले. त्यानुसार तिने जळगाव शहर  पोलिस स्टेशन गाठले.

पती इश्वर गोविंदा व्यास, सासु ज्योती गोविंद व्यास, सुरज अरविंद व्यास, गोविंद व्यास, मामा मनोज तिवारी, आनंद व्यास, सुधीर कोकाटे, पिंटू सपकाळे, इश्वरचा मित्र आदींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.न. 48/2024 भा.द.वि. 376, 377, 354, 354 (ब), 420, 323, 506, 120 (ब), 498 (अ), 34 नुसार हा गुन्हा जळगाव शहर  पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र बागुल करत आहेत. (या कथेतील पिडीतेचे “दामिनी” हे नाव  काल्पनिक आहे).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here