चॉपरसह दहशत निर्माण करणा-या फरार आरोपीस अटक

जळगाव : चॉपर हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या फरार आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. 

दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी रात्री 08:30 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील तांबापुरा, खदान नजीक रईस शेख रशीद (रा. मच्छी बाजार, तांबापुरा, जळगाव) आणि मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत (रा. बिलाल चौक, नविन तांबापुरा, जळगाव) असे दोघेजण चॉपर सोबत बाळगत दहशत निर्माण करत होते. यावेळी रईस शेख रशीद यास चॉपर सह पकडण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पोलिस पथक त्याच्या मागावर होते.

5 फेब्रुवारी 2024 रोजी रफत हा जळगाव शहरात आला असल्याची  माहीती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना समजली. तांबापुरा परिसरातून सकाळी पाच वाजता सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील, किशोर पाटील, पो.कॉ. ललीत नारखेडे आदींच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. रफत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापुर्वी चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here