जळगाव : जळगाव शहरातील वजनदार पोलिस स्टेशन समजल्या जाणा-या एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील दोघा पोलिस कर्मचा-यांमधे अगोदर शाब्दिक चकमक आणि नंतर बाचाबाची, धक्काबुक्की वजा हाणामारी झाल्याचे समजते. या वृत्ताची शहानिशा करण्याची गरज असून “क्राईम दुनिया” या वृत्ताची हमी घेत नसून मिळालेली माहिती धक्कादायक आहे.
मिळालेल्या व समजलेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनमधील एक कर्मचारी अवैध गॅस व भंगार व्यावसायीकांकडून धनराशी संकलीत करण्याचे अर्थात जमाकर्ता म्हणून काम करतो. याच पोलिस स्टेशनमधील दुसरा कर्मचारी अवैध दारु, गावठी दारु व्यावसायिकांकडून धनराशी संकलीत करण्याचे काम करत असल्याचे म्हटले जाते. याबाबत वरिष्ठांना कितपत माहिती आहे हा वेगळा विषय आहे.
आर्थिक किनार आणि वाद असलेल्या या कामातून दोघा कर्मचा-यांमधे सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची व नंतर धक्काबुक्की झाल्याचे समजते. हा विषय बाहेर आल्यानंतर पोलिस दलात सुरुवातीला कुजबुज व नंतर चर्चा सुरु झाली. दोघे कर्मचारी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे म्हटले जात आहे. या वृत्ताची सत्यता बाहेर यावी असे जनतेत म्हटले जात आहे.