जळगाव : फैजपूर पोलिस उप विभागात अवैध गुटखा बाळगणा-याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सुनिल अशोक मखीजा (रा. न्हावी ता. यावल) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व गुटख्याचा साठा बाळगणा-याचे नाव आहे. त्याच्या कब्जातून 59 हजार 806 रुपये किमतीचा अवैध गुटख्याचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. न्हावी हे अवैध उद्योगांचे केंद्रस्थान असल्याचे फैजपूर परिसरातील लोक म्हणतात. फैजपूर पोलिस उप विभागातील न्हावी हे गाव सट्टा जुगाराचे देखील केंद्रस्थान म्हटले जाते. याच गावात बडा सट्टा व्यावसायीक कार्यरत असल्याचे म्हटले जाते. या सट्टा व्यावसायीकाच्या अख्यत्यारीत अनेक गावे जोडली गेली आहेत.
न्हावी येथील सुनिल मखीजा याच्य कब्जातून विमल पान मसाला, केशर युक्त विमल पान मसाला, करमचंद प्रिमीयम पान मसाला, राजश्री पान मसाला, व्ही-१ तंबाखू पाऊज, राजनिवास सुंगधी पान मसाला, केसी-१००० जाफराणी जर्दा, झेड एस-१ जाफराणी जर्दा, क्लॅक लेबल-१८ पानमसाला, विविध कंपनीचा पानमसाला, तंबाखू युक्त पान मसाला, जाफरानी जर्दा असा 59 हजार 806 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फैजपूर पोलिस स्टेशनला विविध कलमाखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सुनिल पाटील, पोहेकॉ. गणेश मनुरे, पोहेकॉ. दिलीप तायडे, पोना. अलताफ अली, पोकॉ. सुमीत बावीस्कर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.