जळगाव : गावठी कट्टयासह तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अटक केली आहे. पहिल्या कारवाईत 28 फेब्रुवारी रोजी अरशद शेख हमीद उर्फ अण्णा (रा. गेंदालाल मिल जळगाव) यास जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरातून गावठी कट्टयासह अटक केली होती.
दुसऱ्या कारवाईत 29 फेब्रुवारी च्या रात्री जे.के. पार्क मेहरुण बगीचा परिसरातून दिपक लक्ष्मण तरटे (रा. नागसेन नगर रामेश्वर कॉलनी जळगाव) आणि अमन रशिद सैय्यद उर्फ खेकडा वय (रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) अशा दोघांना त्यांच्या ताब्यातील प्रत्येकी एक अशा दोन गावठी कट्टयासह अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांचा साथीदार विशाल अहिरे हा पळून जाण्यात यशस्वी झाला. बजाज पल्सर मोटार सायकल आणि गावठी कट्टे असा एकुण 1 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.
दिपक लक्ष्मण तरटे आणि अमन रशिद सैय्यद उर्फ खेकडा या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या. वसीम एम देशमुख यांनी त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अँड. श्रीमती स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउनी दिपक जगदाळे, पोउनी दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेका. सचीन मुंढे, पोहेका गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पोना, किशोर पाटील, पोना, सचीन पाटील, पोना, योगेश बारी, सुधीर सावळे, पोकॉ. किरण पाटील, पोका, छगन तायडे, पोका. ललीत नारखेडे, राहुल रगडे यांनी कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील अमन रशिद सैय्यद उर्फ खेकडा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी एकुण 18 गुन्हे दाखल आहे तसेच दिपक लक्ष्मण तरटे याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत.