अ‌ॅपल कंपनी आणणार स्वत:चे सर्च इंजीन

On: August 30, 2020 12:55 PM

अमेरिकेतील टेक कंपनी अ‌ॅपल लवकरच स्वत:चे सर्च इंजिन लाँच करणार आहे. त्यामुळे अ‌ॅपल कंपनी गुगलला टक्कर देऊ शकते. अ‌ॅपल आपल्या स्पॉटलाइट सर्च इंजिनसाठी अभियंत्यांची नियुक्ती करत आहे. मॅक ओएसमध्ये दिलेले स्पॉटलाइट एक महत्वाहे सर्च फीचर आहे.

या फिचरमुळे युजर्स आपल्या मॅकबुकपासून वेबचा कन्टेंट सर्च करु शकतात.अ‌ॅपलच्या सर्च इंजिन नोकर भरतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग (ML) आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा (NLP) या घटकांचा उल्लेख केल्यामुळे या पदांची कंपनी भरती करणार असल्याचे दिसून येते.

गुगल अ‌ॅपलला प्रत्येक वर्षी आयफोन, आयपॅड आणि मॅक ओएसमध्ये डिफॉल्ट सर्च इंजिन ठेवण्यासाठी लाखो रुपये अदा करते. देते. गुगल सर्च डिफॉल्ट असल्यामुळे अन्य सर्च इंजिनला मोबाइल फोन आणण्याची संधी प्राप्त होत नसल्यचे अथॉरिटीचे म्हणणे आहे. अ‌ॅपल प्रथमच गुगलचा पर्याय म्हणून आपल्या डिव्हाइसमध्ये सर्च इंजिनचा वापर करु शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment