धुळे : हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून अटकेची भीती दाखवत तक्रारदाराकडून दीड लाख रुपये लाखेची मागणी करण्यासह दोघा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लाच स्विकारणाऱ्या धुळे एलसीबी पोलीस निरीक्षक दत्ता शिंदे यांच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता व दस्तावेज एसीबीला आढळून आली आहे.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, दत्तात्रय शिंदे यांच्यासह दोघा कर्मचाऱ्यांविरूध्द लाचखोरी प्रकरणी दोंडाईचा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या अनुशंगाने केलेल्या घर झडती दरम्यान दत्तात्रय शिंदे यांच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता आढळली.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे सुमारे साठ लाख रूपये किमतीची सोन्याची बिस्कीटे व दागीने तसेच सुमारे 77 हजार रूपयांची चांदीची भांडी व दागीने जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या कुटुंबातील व इतर व्यक्तींच्या नावे सुमारे 1 कोटी 75 हजार रूपयाच्या स्थावर मालमत्तेच्या खरेदी खताचे दस्ताऐवज जप्त करण्यात आले आहेत. या गुन्हयाचा पुढील तपास धुळे एसीबी विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती रूपाली खांडवी करत आहेत.