बकऱ्या चोरणाऱ्या रिक्षा चालकास अटक

जळगाव : जळगाव शहराच्या कासमवाडी परिसरातील बकऱ्या चोरणाऱ्या रिक्षा चालकास रिक्षासह एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सरफराज उर्फ सोनू सईद खान (रा. सुप्रीम कॉलनी जळगाव)असे अटकेतील रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहे. या गुन्ह्यात सरफराजची पत्नी मर्जीना हिचा देखील सहभाग असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 

दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील कासमवाडी परिसरातून रहिवाशांच्या एकूण 15 बकऱ्या चोरी झाल्या होत्या. या घटनेप्रकरणी इंदुबाई रामा कोळी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुध्द बक-या चोरीची फिर्याद दाखल केली होती. 

तपासाअंती या गुन्ह्यात प्रवासी रिक्षाचा वापर झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना समजली. हा गुन्हा रिक्षा चालक सरफराज उर्फ सोनू सईद खान याने त्याच्या साथीदारासह केल्याचे देखील निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यात सरफराज याची पत्नी मर्जीना हिचा देखील सहभाग असल्याचे उघड झाले. पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बबन आव्हाड, पोउनि दत्तात्रय पोटे, पोउनि दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सफौ राजेंद्र उगले, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, सचिन पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे आदींनी या गुन्ह्यात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here