जळगाव : लागवड केलेल्या लाखो रुपये किमतीच्या गांजाच्या झाडांसह रावेर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अक्रम कासम तडवी आणि शाहरुखख कासम तडवी अशी कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांकडून 6 लाख 21 हजार 520 रुपये किमतीचा 1 किलो 400 ग्रॅम वजनाचा लागवड केलेला गांजा जप्त करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग गावाच्या रस्त्यालगत शेतीत गांजाची लागवड होत असल्याची माहिती पो.नि. डॉ. विशाल जायस्वाल यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष अडसुळ, पोलीस उप निरीक्षक सचिन नवले, हे.कॉ. ईश्वर चव्हाण, पोना जगदीश पाटील, पोना कल्पेश आमोदकर, मुकेश मेढे, सचीन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, समाधान ठाकूर, संभाजी बिजागरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.