४३ कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त

नवी दिल्ली : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) म्यान्मामधून भारतात आणलेले तस्करीचे ४३ कोटी रुपयांचे ८३.६ किलो सोने जप्त केले आहे. या तस्करीच्या गुन्हयात अटकेतील आठ आरोपी हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्हयातील असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. त्यांना शुक्रवारी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली.दिब्रूगढ-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने हे आठ तस्कर शुक्रवारी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली.

त्यांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातुन सोन्याच्या ५४० विटा जप्त करण्यात आल्या. खास बनावटीच्या कपड्यात त्या सोन्याच्या विटा दडवण्यात आल्या होत्या. हे सर्व जण बनावट आधार कार्डवर प्रवास करत होते. विदेशी चिन्हे असलेल्या सोन्याच्या विटा घेवून हे तस्कर मणिपूरमधील मोहे येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरून मान्मामधून भारतात आले होते. दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यात या सोन्याची विक्री केली जाणार होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here