मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. तशी घोषणा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. कुलगुरु समितीच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत चर्चा झाली. या चर्चेत कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता कशा रितीने घेता येतील याची चाचपणी करण्यात आली. त्यानंतर सरकारकडे या समितीने आपला अहवाल सुपुर्द केला. आता सप्टेंबरचा पूर्ण महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात आला असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षा सुरु केल्या जातील असे सामंत यांनी माहिती दिली आहे.
या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार असून त्या परिक्षा घरात बसूनच विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत. यासाठी कमी मार्कांची परीक्षा घेण्यात येईल. 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढीसाठी युजीसीला विनंती केली जाणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाची दोन ते तीन दिवसात बैठक घेतली जाईल.
परिक्षेसाठी मुदतवाढ हवी असल्यास ती युजीसीकडून मान्य करावी असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याबाबत राज्य सरकार युजीसीकडे चर्चा करणार आहे. युजीसीने 31 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे म्ह्टले होते. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर पडू दिले जाणार नाही असे आश्वासन शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.