नवी दिल्ली : जगभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 30 सप्टेंबर अखेर बंदच राहणार आहे. नागरी उड्डाण संचालनालयाने याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुक बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अनलॉक-4 मध्येही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कायम ठेवला. सक्षम प्राधिकरणाद्वारे ठरविण्यात आलेल्या मार्गांवर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीस परवानगी देता यईल असे देखील या परिपत्रकात म्हटले आहे.