एलसीबीचा मुक्ताईनगरातील जुगार अड्ड्यावर छापा

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. सदर कारवाई मध्यरात्री उशीरापर्यंत सुरु होती. या कारवाईत 78 हजार 900 रुपये रोखीसह एकुण 12,41,400 रुपयंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालात एक कार, 10 मोबाईल फोन, 20 मोटार सायकली व एक रिक्षा यांचा समावेश आहे. या कारवाईने मुक्ताईनगर शहर व तालुक्यात खळबळ माजली आहे.

संतोष गोपाल जवरे, मंगेश विष्णुनाथ मानकर (दोन्ही रा. पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा) , गजानन देविदास ढाणे, संदिप सागर पाटील (दोन्ही रा. पारंबी ता. मुक्ताईनगर, कृष्णा चंद्रकात बजरे रा. खेराळा ता. मुक्ताईनगर, सोपान नारायण खिरळकर रा. कु-हा ता.मुक्ताईनगर, सोपान जनार्धन वरगे रा. लोणवाडी ता. नांदुरी जि. बुलढाणा यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

तालखेडा शिवार , उमरा फाटा, ता. मुक्ताईनगर येथे करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस निरिक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक लहारे, पोलिस हवालदार सुधाकर अंभोरे, विजयसिंग पाटील, रविंद्र घुगे, शरद भालेराव, महेश महाजन, रमेश जाधव, राजेंद्र पवार यांच्या पथकाने कारवाई केली.
या प्रकरणी पोलिस हवालदार जितेंद्र राजाराम पाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई मुक्ताईनगर पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here