रामदेववाडी अपघात गुन्ह्यातील बदलले तपासाधिकारी – गुप्ता यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव : पुण्याच्या घटनेपेक्षा जळगाव नजीक रामदेववाडी येथील अपघाताचे स्वरुप गंभीर आहे. या अपघातात एकुण चार जण ठार झाले आहेत. या प्रकरणाचा तपास अधिकारी बदलण्याची मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी शासन स्तरावर वरिष्ठ पातळीवर केली होती.

या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक ए. सी. मनोरे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. डीवायएसपी संदीप गावीत यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे. या घटनेत अर्णव अभिषेक कौल हा कार चालवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अर्णव याला आयसीयूतून बाहेर काढण्यात आले असले तरी त्याची प्रकृती अद्यापही चिंताजनकच आहे

जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे आशा वर्कर असलेल्या वत्सला सरदार चव्हाण या काम संपवून मुलगा सोहम (वय 8), सोमेश (वय 2) सर्व ह. मु. रामदेववाडी, ता. जळगाव) व भाचा लक्ष्मण नाईक (वय 17), रा. मालखेडा, ता. जामनेर) हे मंगळवार 7 मे रोजी दुचाकीने शिरसोली येथे येत होते.

रामदेववाडी गावाच्या पुढे भरधाव कारने (क्र. एम.एच. 19 सी.व्ही. 6767) चव्हाण यांच्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत वत्सला (27) व मुलगा सोमेश चव्हाण (2) हे दोघे जागीच ठार झाले होते. सोहम चव्हाण (8) याचा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. पुण्याच्या घटनेपेक्षा रामदेववाडी येथील घटनेत अधिक सक्षम असलेले 304 हे कलम लावण्यात आले आहे.

गंभीर जखमी लक्ष्मण राठोड (17) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. पुण्यातील घटनेत कारचालक आरोपी अल्पवयीन  तर जळगावच्या घटनेतील आरोपी हा सज्ञान आहे. या घटनेत अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या घटनेत संशयीतांना वाचवण्यासाठी काही लोक राजकारण करत असल्याचे भावना व्यक्त केली जात आहे. गावचे पोलीस पाटील यांची भूमिका देखील संशयास्पद असून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here