भावसार समाजातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरीत

जळगाव : भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS) तर्फे गरजू  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. जळगाव येथील गायत्री मंदिरात हा कार्यक्रम भव्यदिव्य स्वरुपात संपन्न झाला. यावेळी सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन  सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. एक डझन नवनीत वही, एक स्कूल बॅग, कंपास बॉक्स, लंच बॉक्स, पाणी बॉटल अशा स्वरुपाचा संपूर्ण सेट प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आल. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य या कार्यक्रमाचे फलित ठरले. धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समाजाची एकी दिसून आली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगावचे प्रकाश भावसार उर्फ पपडी पहीलवान हे होते. ह.भ.प. भरत मार्तंड ब-हाटे महाराज, अरुण रामप्रसाद भावसार अमळनेर, सुभाष झेंडू भावसार धरणगाव, धुळे समाज अध्यक्ष गोपीचंद जानकीराम पांडव आणि कार्यकारणी, जळगाव पिंप्राळा समाज अध्यक्ष पंडित उत्तमशेठ भावसार आणि कार्यकारणी यांची यावेळी उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष कैलास भावसार नंदुरबार यांनी कार्यक्रमाची संकल्पना याप्रसंगी विषद केली. कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाची व्यवस्था होती. जळगाव टीम मधील सौ.निता भावसार यांनी सूत्रसंचालन केले. देविदास भावसार, प्रवीण सिताराम भावसार,भावेंद्र भावसार, गिरीश भावसार (सर) यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here