जळगाव : इलेक्ट्रीक मोटारी चोरी करुन त्या अनोळखी भंगार विक्रेत्यास विकणा-या तिघा चोरट्यांना भडगाव पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. जिभाऊ दयाराम मोरे, सोमनाथ उर्फ चेतन शिवराम मोरे आणि सतिष शांताराम मोरे (तिघे रा. गुढे ता. भडगाव) अशी अटकेतील तिघा चोरट्यांची नावे आहेत.
गुढे गावातील यशवंत भिला पाटील यांच्या शेतातील सुमारे सात हजार रुपये किमतीच्या तिन इलेक्ट्रीक मोटारी चोरी झाल्या होत्या. या चोरीप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास सहायक फौजदार पांडुरंग ओंकार सोनवणे करत होते.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे गुढे गावातील तिघांनी हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. तिघांनी आपला गुन्हा कबुल केला. तसेच चोरीच्या मोटारी त्यांनी अनोळखी भंगार विक्रेत्यास विकल्याचे देखील कबुल केले. मोटारी विकून आलेले 2700 रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यचा पुढील तपास स. फौ. पांडुरंग ओंकार सोनवणे, स.फौ. अनिल रामचंद्र अहिरे, पोहेकाँ निलेश ब्राम्हणकार, पोना. एकनाथ धनराज पाटील, पोकाँ सुनिल जयसिंग राजपुत यांनी केला.