मोबाईल चोरट्यास मुद्देमालासह अटक

जळगाव : जळगाव बस स्थानक परिसरातून दोघा प्रवाशांचे मोबाईल चोरणा-या चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून दोन्ही मोबाईल हस्तगत केले आहे. मोबाईल चोरीला गेलेल्या दोघांपैकी एका प्रवाशाने दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

शनिवार 1 जून रोजी भर दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला होता. सुरज संजय बारी आणि संतोष लक्ष्मण वानखेडे हे दोघे प्रवासी भुसावळ येथून जळगावला आले होते. जळगाव बस स्थानकात बसमधून खाली उतरल्यानंतर आपले मोबाईल चोरीला गेल्याचे दोघांच्या लक्षात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध भाग 5 गु.र.नं. 164/2024 भा.द.वि. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पो.कॉ. तुषार पाटील यांना एक इसम संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पो.हे.कॉ. सलीम तडवी यांच्यामार्फत वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. सलीम तडवी, पो. कॉ. तुषार पाटील, पो.कॉ. जयेश मोरे आदींनी त्या संशयीत इसमास ताब्यात घेत सखोल चौकशी केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात चोरीचे दोन मोबाईल आढळून आले. मुजीबुर रहमान मोहम्मद इस्माईल (रा. गुलशन नगर, उमर युसूफ मशिद जवळ, मालेगांव जि. नाशिक) असे त्या चोरट्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई करण्यात आली. या गुन्हयाचा पुढील तपास म.पो.हे.कॉ. पल्लवी मोरे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here