धावत्या रेल्वेत चोरी करणारे चौघे जेरबंद

जळगाव : धावत्या रेल्वे प्रवाशांच्या मोबाईलसह रोख रकमेची चोरी करणाऱ्या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी (रा. शिरसोली नाका, तांबापुरा जळगाव), शेख अजर शेख मजर (रा. पाण्याच्या टाकीसमोर सुप्रीम कॉलनी जळगाव),  सुधिर सुभाष भोई (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) आणि अल्ताफ फिरोज खान (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) अशी चौघा चोरट्यांची नावे आहेत. 13202 अप जनता एक्सप्रेस मध्ये या चौघांनी प्रवाशांकडील 60 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला होता. या घटनेप्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

2 जून 2024 रोजी बिहार राज्यातील रोहित विमल यादव हा तरुण आपल्या दोघा मित्रांसह पटना ते मुंबई प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान हा चोरीचा प्रकार घडला. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान जळगाव आरपीएफ यांच्याकडून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी, शेख अजर शेख मजर, सुधीर सुभाष भोई व अल्ताफ फिरोज खान अशा चौघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने 3 जून रोजी दुपारी तीन वाजता मेहरुण परिसरातून ताब्यात घेतले. चौघांकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यांना रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन मारुती आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पीएसआय दिपक जगदाळे, पोहेकॉ समाधान टहाकळे, पोना विकास सातदिवे, पोना किशोर पाटील, पोना सचिन पाटील, पोकॉ चंद्रकांत पाटील, पोकॉ इम्रान बेग, पोकॉ चद्रकांत पाटील तसेच जळगाव रेल्वे सुरक्षा बल अधिकारी पो. नि. देवीप्रसाद मिना, पीएसआय के आर तड, पी.डी. पाटील, महेंद्र कुसावा, विनोद जेटवे, विनोदकुमार आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here