जळगाव : सामाजिक वनीकरण विभाग, चेतना व्यसनमुक्ती केंद्र आणि राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त परिश्रमातून 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला. यावेळी जळगाव पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी चिंच, पिंपळ, लिंब अशा सुमारे साठ रोपांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी पोलिस अधिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. नितीन विसपुते, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रवीण पाटील, वनपरिक्षेत्राधिकारी एस.आय. पिंजारी, वनपाल एस. आर. पाटील, वनरक्षक बलदेव मोरे, संभाजी पाटील, अमोल ढोबळे, प्राचार्य रुपाली वाघ, डॉ. सपना बोथरा, संघपाल तायडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतीक सोनार, दीपक पाटील, किरण सोनवणे, निलेश काळे आदींनी परिश्रम घेतले.