पाच हजाराची लाच स्विकारणा-या मंडळ अधिका-याविरुद्ध गुन्हा

ACB-Crimeduniya

जळगाव : सात बारा उता-यावरुन वडीलांसह आते भावाचे नाव कमी करुन आईचे नाव लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्विकारणा-या मंडळ अधिका-यास जळगाव एसीबी पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध रामानंद नगर  पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण खंडू बाविस्कर असे सजा पिंप्राळा येथील लाचखोर मंडळ अधिका-याचे नाव आहे.  

या घटनेतील तक्रारदाराकडे सुरुवातीला दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. एसीबी पथकाने पंचासमक्ष केलेल्या पडताळणीत पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. नियोजीत सापळा कारवाईत पाच हजार रुपयांची लाच स्विकारतांना मंडळ अधिकारी किरण बाविस्कर यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा व तपास अधिकारी तथा  पोलिस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने तसेच कारवाई मदत पथकातील पो.नि. एन.एन. जाधव, पी.एस. आय.सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे,मपोहेकॉ शैला धनगर ,पोना.किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे ,पोकॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. प्रणेश ठाकूर, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here